Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या ६ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात; २ जागांवर भाजपची फिल्डिंग?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील ५ ते ६ विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह आला आहे. या ५ ते ६ विद्यमान खासदारांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी सुरू महायुतीकडून सुरु आहे.
Eknath SHinde- Devendra Fadnavis
Eknath SHinde- Devendra FadnavisSaam Tv
Published On

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेनेच्या सहा विद्यमान खासदारांना डावललं जाण्याची शक्यता आहे. महायुतीने केलेल्या सर्वेक्षणात या सहा उमेदवारांबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास पराभवाचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, यावर महायुतीत चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील ५ ते ६ विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह आला आहे. या ५ ते ६ विद्यमान खासदारांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी सुरू महायुतीकडून सुरु आहे. महायुतीचा शेवटच्या टप्यातील सर्व्हेत या खासदारांची कामगिरी असमाधानकारक राहिली असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर हा सर्व्हे करण्यात आला होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath SHinde- Devendra Fadnavis
Manoj Jarange News: मनोज जरांगे वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमुळे चर्चा

शिवसेनेच्या कोणत्या खासदारांचा रिपोर्ट निगेटिव्ह

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. गोडसेंच्याजागी इतर नावांचा सध्या विचार सुरु आहे. यामध्ये छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.

यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचादेखील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांच्याजागी मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागी येथे भाजप उमेदवार देण्याती शक्यता आहे.

रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांच्या जागी शिवसेनेने राजू पारवेंना उमेदवारी दिल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे.   (Latest Marathi News)

Eknath SHinde- Devendra Fadnavis
Maharashtra Loksabha : महाविकास आघाडीत जायचं का नाही? प्रकाश आंबेडकर उद्या घेणार फायनल निर्णय

मुंबई उत्तर-पश्चिममधून गजानन किर्तीकर विद्यमान खासदार आहे. त्यांच्या जागी अन्य पर्यायी नावांची चाचपणी सुरू आहे. येथून काही बॅालिवूड कलाकारांच्या नावांचीही चर्चा आहे.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या जागी भाजपकडून समरजीत घाटगे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com