Raj Thackeray Uddhav Thackeray Photo Saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; 'शिवाजी पार्क'साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच! इनवर्ड नंबरमुळे पेच सुटणार?

MNS Vs Shivsena Thackeray Group: सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एकाच दिवशी अर्ज केल्याने अन् सभेची तारीखही एक असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १ एप्रिल २०२४

Maharashtra Politics News:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यात प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसणार आहेत. अशातच आता सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एकाच दिवशी अर्ज केल्याने अन् सभेची तारीखही एक असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

शिवाजी पार्क कोणाला मिळणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, 17 मे ला प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याच दिवशी म्हणजे १७ मेलाच शिवसेना ठाकरे गटानेही शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे सभेची तारीखही एकच आहे आणि दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी म्हणजे 18 मार्च रोजीच मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे.

मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच!

त्यामुळे आता शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला परवानगी मिळणार की मनसेची सभा होणार याबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. परंतु 17 मे ला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं मुंबई महापालिकेने दिलेल्या इनवर्डनंबर वरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे आता १७ मे रोजी शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार!

तत्पुर्वी, ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसे महायुतीत जाणार असल्याची चर्चा त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली अमित शहांची भेट आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही सभा महत्वाची ठरणार असून राज ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT