Yavatmal Washim Loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: भावना गवळींची उमेदवारी घोषित करा अन्यथा राजीनामे देणार; शिवसैनिक आक्रमक

Maharashtra Politics: भावना गवळी यांची उमेदवारी घोषित करा अन्यथा आम्ही राजीनामे देणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

मनोज जयस्वाल, वाशिम|ता. १ एप्रिल २०२४

Yavatmal Washim Loksabha Constituency News:

यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. यवतमाळमध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असून संजय राठोड यांना उमेदवारी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

मात्र भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भावना गवळी यांची उमेदवारी घोषित करा अन्यथा आम्ही राजीनामे देणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Loksabha Election)

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या संदर्भात शिवसेना पदाधिकारी गट प्रमुख, बूथ प्रमुख, शिवदुत, शिवसैनिक यांची अत्यंत महत्वाची बैठक वाशिम इथे पार पडली. यावेळी भावना गवळी यांनाच उमेदवारी जाहीर करा, अन्यथा सर्व पदाचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.

तसेच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यप्रणालीवर टीका करत भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास कुणाचेही काम करणार नाही, असा निर्धारही यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. महायुतीने जर दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही करणार नाही, असा ठराव घेऊन आक्रमक पवित्रा भावना गवळी (Bhavana Gawali) समर्थकांनी घेतला आहे.

दरम्यान, यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून मंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भावना गवळींचा पत्ता कट होऊन संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

Mumbai Mayor : खान की मराठी, मुंबईचा महापौर कोण? राजकारण पेटलं, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

SCROLL FOR NEXT