अर्जुन खोतकर यांनी वाशिममध्ये पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलं. लोकं तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करतात, पण मी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करत होतो, असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलंय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केलेलं हे विधान ऐकून एकच हशा पिकला. दरम्यान, यावेळी अर्जुन खोतकर यांनी नाराज भावना गवळी यांच्याबाबतही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
अर्जुन खोतकर यांना यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. पण तेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या, असा प्रश्न खोतकरांना उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना खोतकरांनी मिश्किल वक्तव्य केलं. ते म्हणाले की, मला पक्षाकडून ऑफर होती, की तुम्ही लढलं पाहिजे. खरंतर लोकं तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करतात. पण मी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्यात यशस्वीही झालो, असं म्हणत खोतकरांनी टोला लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा महायुतीमध्ये अजूनही कायम आहे. अशात या जागांचा उमेदवार कधी ठरतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याबाबत प्रश्न विचारला असता खोतकरांनी हा तिढा जवळपास सुटलेला असल्याचं सांगितलं. सरकार तीन पक्षांचं असल्यानं थोडा वेळ लागला असल्याचंही खोतकरांनी यावेळी मान्य केलं. दरम्यान, तिढा सुटला असला तरी नेमका या दोन लोकसभा मतदार संघांमधून उमेदवारी कुणाला मिळते, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
वाशिमध्ये राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी अर्जुन खोतकर आलेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. राजश्री पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, त्यासाठी वेगवेगळ्या टीम निर्माण केल्या असून, त्यातलाच एक मीही आहे, असंही ते म्हणाले. शिवाय इथे सहाच्या सहा ठिकाणी आमचे आमदार असल्यामुळे विजयाची अडचण होणार नाही, राजश्री पाटीलच जिंकून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यंदा उमेदवारी न मिळाल्यामुळे खासदार भावना गवळी नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या नाराजीवरही अर्जुन खोतकर यांनी महत्त्वाचं विधान केलं. भावना गवळी यांना मी स्वतः फोन करतोय, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहेत, असं खोतकर म्हणाले. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द दिलेला आहे, असंही खोतकर यांनी नमूद केला. दोन तीन दिवसांत भावना गवळी कामाला लागतील, सक्रिय होतील, असंही खोतकरांनी सांगितलं. उमेदवारी मिळाल्यामुळे थोडी नाराजी असू शकते, असंही खोतकरांनी यावेळी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.