Share Market On Loksabha Election Result 
लोकसभा २०२४

Share Market: लोकसभेच्या निकालावर ठरणार शेअर मार्केटचं गणित; बाजार गडगडणार की उसळणार?

Share Market On Loksabha Election Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलंय तेवढंच लक्ष शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांचंही लागलंय,. त्यामुळे 4 जूनच्या निकालानंतर शेअर मार्केट गडगडणार की उसळी घेणार याबाबत उत्सुकता लागलीय. शेअर मार्केटचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

मुंबई: देशात लोकसभेच्या निकालाची उत्सुकता जेवढी सामान्य जनतेला लागलीय. तेवढीच शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना लागलीय. भाजपविरोधातील वातावरणामुळे शेअर मार्केटवर चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी 4 जूनला शेअर मार्केट रेकॉर्ड ब्रेक उसळी घेणार असल्याचा दावा केलाय. राजकीय समीकरणांवर शेअर मार्केटचं गणित कसं अवलंबून असेल यावर बर्नस्टिन यांच्या रिपोर्टमधून विश्लेषण करण्यात आलंय.

देशात लोकसभेच्या निकालाची उत्सुकता जेवढी सामान्य जनतेला लागलीय. तेवढीच शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना लागलीय. भाजपविरोधातील वातावरणामुळे शेअर मार्केटवर चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी 4 जूनला शेअर मार्केट रेकॉर्ड ब्रेक उसळी घेणार असल्याचा दावा केलाय. राजकीय समीकरणांवर शेअर मार्केटचं गणित कसं अवलंबून असेल यावर बर्नस्टिन यांच्या रिपोर्टमधून विश्लेषण करण्यात आलंय.

पहिल्या शक्यतेचा परिणाम

भाजपला 240 आणि NDA ला 270 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर सरकार रस्ता, विमानतळ, रेल्वे बनवण्याऐवजी रेवडी वाटण्याचं काम करेल. त्यामुळे असा निकाल आल्यास शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग होईल. तसंच वर्षभरात कमी रिटर्न मिळण्याची शक्यता.

दुस-या शक्यतेचा परिणाम

भाजप 240 ते 260 आणि एनडीएने 270 ते 290 जागा जिंकल्यास मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री होईल. त्यामुळे वर्षभरात रिटर्न सिंगल डिजीटमध्ये राहण्याचा अंदाज.

तिस-या शक्यतेचा परिणाम

भाजपला 290 पेक्षा जास्त आणि एनडीएला 340 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास शेअर मार्केट तेजीत असेल. तर वर्षभराचं रिटर्न दोन अंकी असेल.

एकीकडे भाजपच्या बहुमताच्या अंदाजाने शेअर मार्केटमध्ये उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरीकडे जेफरीजच्या क्रिस वूडच्या अहवालात भाजप पराभूत झालं तर काय होऊ शकतं यावर भाष्य केलंय.

2004 प्रमाणे निकाल लागण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

2004 मध्ये दोन दिवसांत शेअर मार्केट 17 टक्क्यांनी कोसळलं होतं.

भाजप पराभूत झाल्यास शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल.

2019 इतक्या जागा भाजपने जिंकल्यास सरकार स्थिर असेल.

त्यामुळे शेअर मार्केटऐवजी भांडवली टॅक्सवाढीसाठी धोक्याची घंटा असेल.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15 टक्के तर लाँग टर्म 10 टक्के होण्याची चर्चा आहे.

वाढलेल्या ऑप्शन ट्रेडिंगवरून सरकार पावलं उचलण्याची शक्यता आहे.

भाजपचं सरकार बहुमताने आलं तर त्याचा परिणाम शेअर मार्केटच्या विक्रमी तेजीत असेल. मात्र गुंतवणूकदारांनी खबरदारी घेऊनच गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. लोकसभा निकालाच्या अंदाजावरून शेअर मार्केटमधील चिंता काहीशी कमी झालीय. त्यामुळे निवडणूकीच्या दिवशीचा विचार केला नाही तर कोणतंच नुकसान होत नसल्याचं जाणकार सांगतात. मात्र शेअर मार्केट गडगडणार की उसळी घेणार हे मात्र 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT