Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar News: सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Satish Daud-Patil

Sharad Pawar on Satara Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून सातारा लोकसभेची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान, त्यांनी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. श्रीनिवास पाटील यांची संसदेत कामगिरी चांगली होती. पण त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्यास (Lok Sabha Election 2024) नकार दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

"श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहावं, अशी इच्छा होती. पण त्यांनी प्रकृतीचे कारण देत उमेदवारी घेण्यास नकार दिला. माझ्याकडून मतदारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही", असं श्रीनिवास पाटील यांनी आपल्याला सांगितलं असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे धरला होता. मात्र, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागतं आहे. त्यामुळे मला तुमची इच्छा पूर्ण करता येणार नाही, असं शरद पवार कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत कार्यकर्त्यांनी काही सूचना करत नावे सूचवली आहेत. यावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करून एक ते दोन दिवसांत निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: गालावर खळी, डोळ्यावर धुंदी...कलरफुल पूजाचा गुलाबी अंदाज

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा मुंबईत रोड शो; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो सेवा बंद

Gautam Gambhir Statement: तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या डिव्हिलियर्स अन् पीटरसनवर गंभीर भडकला

Yavatmal Crime: युवकानं अंगावर पेट्राेल ओतून घेतल्याने पंचायत समिती कार्यालयात उडाला गाेंधळ

Dindori Loksabha: कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नाही; निर्यात बंदीवरून भारती पवारांची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT