Sanjay Shirsat Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: ठाकरे गटात वादाच्या ठिणग्या, सोमवारपर्यंत राजकीय भूकंप; शिंदे गटाचा दावा

Sanjay Shirsat : आमदार नेते, कार्यकर्ते रोज पक्षप्रवेश होत आहेत, हे नेते उबाठा गटाचे आहेत. आता सुरू असलेला संतोषाची वाट ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पक्षात जे खरे शिवसैनिक आहेत त्यांची जी कोंडी होती,जे काल आलेले आदेशित करत आहेत याचा परिणाम पक्ष सोडण्यावर होत असल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.

डॉ. माधव सावरगावे

Sanjay Shirsat On Thackeray Group :

येत्या सोमवारी राजकीय भूकंप होईल, याचा अर्थ हा फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता नाही. नाराज लोक आमच्याकडे येणार याचा फौसला हा सोमवारी होणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला परत एकदा मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Latest News)

आज केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागलेत. पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची याद्यादेखील जाहीर केल्या जात आहेत. त्याचदरम्यान उमेदवारीवरून नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातदेखील नाराजी असल्याचं बाब समोर येत आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे सोमवारचा दिवस धोक्याचा ठरणार आहे.

ठाकरे गटातील वाद आणि मी म्हटलेला भूंकप याचा काही संबंध नाही असं म्हणत शिरसाट माध्यमांशी बोलताना गुगली टाकली. मी बोललो हे उद्धव ठाकरे गटाने गांभीर्याने घेऊ नका. माझ्या भूकंपाचा आणि उद्धव ठाकरे गटाच्या वादाचा काही सबंध नसल्याचं शिरसाट म्हणालेत.

आमदार नेते, कार्यकर्ते रोज पक्षप्रवेश होत आहेत, हे नेते उबाठा गटाचे आहेत. आता सुरू असलेला संतोषाची वाट ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पक्षात जे खरे शिवसैनिक आहेत त्यांची जी कोंडी होती,जे काल आलेले आदेशित करत आहेत याचा परिणाम पक्ष सोडण्यावर होत असल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैर यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे. त्याचदरम्यान शिरसाट यांनी केलेला हा दावा उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारा आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद नको यासाठी उद्धव ठाकरे यांनी खैरे आणि दानवे यांना मातोश्रीवर येण्यास सांगितलंय. दरम्यान अंबादास दानवे यांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला.

मी नाराज असल्याच्या चर्चांना काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त ५ दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार. मी सर्वसामान्य शिवसैनीक आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चांकडे लक्ष देऊ नये. गेल्या १० वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छूक आहे. मी माझी इच्छा कधीच लपवून ठेवलेली नाही. हे पक्षप्रमुखांना देखील माहिती आहे, अशा शब्दांत दानवेंनी चर्चांवर स्पष्टीकरण आज सकाळी दिलं. यासंदर्भात शिरसाट म्हणाले की, उबाठा गटाला महाराष्ट्रात उमेदवार मिळणे अवघड आहे. चंद्रकांत खैरे यांच्या सारखा पडणारा उमेदवार पुन्हा भेटणार नाही. खैरेच येथे उमेदवार राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

Stress Relief At Work: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

Parola Waterfall: धबधब्यावर भिजायला जायचंय? मग 'पारोळा धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Shani Shingnapur : शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम जमा

SCROLL FOR NEXT