Sanjay Raut Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut: मोदी भयग्रस्त नेतृत्व, सर्व भ्रष्टाचारी पक्षात सामील करून घेतले; संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut Criticized On PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद पार पडली. माध्यमांसोबत संवाद साधताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Rohini Gudaghe

मयूर राणे साम टीव्ही, मुंबई

नरेंद्र मोदी हे खोटे बोलतायेत. मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही, मी नरेंद्र मोदी जे भाजपचे नेते आहेत. जे गुजरातमधून देशावर प्रधानमंत्री म्हणून बसले होते. ज्या कंपन्या, जे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड आहेत. ज्यांच्यावर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले. ईडी सीबीआयच्या (Sanjay Raut) धमक्या देऊन खंडणी वसुली करण्यात आली, ज्यांच्यावर कारवाया झाल्या जे तुरुंगात आहे, त्यांना सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये घेण्यात आले. या गैरव्यवहाराचे समर्थन नरेंद्र मोदी खास मुलाखत घेऊन करत आहेत. हे सर्दे देशवासीय पहात आहेत ऐकत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

या गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करत आहेत. (Sanjay Raut Criticized On PM Modi) मोदी खोटे बोलत आहेत. सर्व भ्रष्टाचारींना मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतलं आहेत. मोदी त्यांच्यावर का बोलत नाहीत, असा सवाल राऊतांनी केला आहे.

मोदी सर्व विषयांवर बोलत आहेत. प्रश्न राजकीय किंवा गैरराजकीय नाही, प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्वशर्मा, सुमेंधु अधिकारी ज्यांना तुम्ही भ्रष्ट म्हणत (Sanjay Raut News) होतात, त्यांना तुरुंगात टाकू असं म्हणत होतात तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही. तुमच्याकडे बोलण्याची स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीच्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही, हे आपण संसदेत आणि बाहेर देखील पाहिलं (Maharashtra Politics) आहे. मोदींनी दहा वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचाची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, पण त्याचं मोजमाप खरं असावं, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

ते नक्की सुशिक्षित आहेत ना? ते जे कोण शिंदे आहेत. बाळराजे! त्यांना लिहिता वाचता येतं ना? मी असं ऐकलं आहे की, ते हाड वैद्य आहेत. त्यांनी माणसांची हाड तपासली की जनावरांची ते पाहा, असा टोला त्यांनी श्रीकांत (Maharashtra Election) शिंदे यांना लगावला. काल केलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या घोटाळ्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते बोलले आहेत. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं हे बाळराजेंना कळेल, असं राऊत म्हणाले आहेत.

विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे परंपरा तोडून वेगळी भूमिका घेणार नसल्याचं राऊतांनी (Maharashtra Politics) म्हटलं आहे. आज शिवसेनेचे मशाल गीत ते लोकांसमोर आणणार आहोत. पुढल्या काही दिवसांमध्ये आमचा एक कॉमन वचननामा प्रसिद्ध होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

SCROLL FOR NEXT