Sanjay Raut On Shrikant Shinde:
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ''खासदार श्रीकांत शिंदे'' फाऊंडेशनमध्ये 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी राऊतांनी केलीये. निवडणूक रोख्यांप्रमाणेच महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप राऊतांनी केलाय.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये 500 ते 600 कोटींचा घोटाळा झालाय. फाऊंडेशनला ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवाल राऊतांनी केलाय. तर देणग्या देणारे मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला. फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? तसंच फाऊंडेशनचे सर्व हिशेब धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? अशी विचारणा राऊतांनी केलीये.
कंत्राटाच्या बदल्यात फाउंडेशनमध्ये कोट्यवधींच्या रोख देणग्या घेतल्याचा राऊत यांचा आरोप आहे. काही लाख रुपयांसाठी विरोधकांवर कारवाई करणाऱ्या ईडी-सीबीआय या फाऊंडेशनवर कारवाई करणार का, असा सवाल राऊत यांनी केलाय. तर पत्राचाळचे आरोपी पत्र लिहू लागलेत म्हणत श्रीकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब टाकलाय. थेट 600 कोटींचा आकडा देऊन राऊतांनी घोटाळ्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणलाय. प्रचारकाळात ठाकरे गटाकडून या मुद्याचा वापर शिंदेंची कोंडी करण्यासाठी केला जाऊ शकतो. राऊतांनी केलेल्या आरोपांच्या बॉम्बचा आवाज शमवण्यासाठी शिंदे गट कुठली चाल खेळणार, हे पाहणं महत्त्वाचंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.