Sangli Loksabha News:
Sangli Loksabha News: 
लोकसभा २०२४

Sangli News: ब्रेकिंग! माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; विशाल पाटलांचा प्रचार करताना दगडफेक

Gangappa Pujari

सांगली|ता: २५ एप्रिल २०२४

सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतेच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलेले माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान सांयकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. यावेळी तिघा अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी विलासराव जगतापांकडून जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हल्लेखोर भाजपाचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. यावरुनच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hair Care Tips: केसांना व्हिटॅमिन ई लावल्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT