Vishal Patil  Saam Tv
लोकसभा २०२४

Vishal Patil: सांगलीमध्ये महाविकास आघाडीला धक्का, विशाल पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Priya More

Sangli Loksabha Election 2024:

सांगली लोकसभा मतदार संघामध्ये (Sangli Loksabha Election 2024) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) आणि कार्यकर्ते नाराज झाले. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

अशामध्ये विशाल पाटील यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत आता विशाल पाटील हे उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीला धक्का बसला.

काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटील यांनी निवडणूक कार्यालय गाठत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पण अशी देखील माहिती समोर आली आहे की, विशाल पाटील हे उद्या शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी ते सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करतील आणि दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपला सांगली जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. जतमधील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आणि थेट अपक्ष निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता. मात्र भाजपकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विलासराव जगताप यांनी नाराजी जाहीर करत भाजपला इशारा देखील दिला होता. अशामध्ये आता त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT