Prithviraj Chavan On Vishal Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Prithviraj Chavan: विशाल पाटील पक्षाच्या हिताचा निर्णय घेऊन अर्ज मागे घेतील, पृथ्वीराज चव्हानांनी व्यक्त केला विश्वास

Sangli Loksabha Election 2024: काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना 'विशाल पाटील पक्षाच्या हिताचा निर्णय घेऊन अर्ज मागे घेतील.', असा विश्वास व्यक्त केला आहे.

Priya More

सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये (sangli loksabha election 2024) काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशामध्ये काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना 'विशाल पाटील पक्षाच्या हिताचा निर्णय घेऊन अर्ज मागे घेतील.', असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये सांगील लोकसभा मतदार संघाविषयी बोलताना सांगितले की, 'विशाल पाटील हे आग्रही नक्कीच होते. त्यांनी वरिष्ठांकडे तशी मागणीसुद्धा केली होती. पण ते पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करतील. विशाल पाटील अर्ज मागे घेतील ही खात्री आहे.' तसंच, 'प्रत्येक काँग्रेस नेत्याचे कर्तव्य आहे काही नाराजी असेल ते दूर करणे. बरीच चर्चा झाली आहे. विशाल पाटील पक्षाच्या हिताचा निर्णय घेतील.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. '१०० दिवसांत परदेशातला काळा पैसा आणतो म्हटले होते. १५ लाख देतो म्हटले तो जुमला होता. भारत सरकारकडे काळा पैशाबाबतची माहिती आहे पण कारवाई झाली नाही. आमचा आरोप आहे मोदींकडे कागदपत्रे असताना कारवाई झाली नाही. तोडपाणी झालेली आहे.' अशी टीका त्यांनी केली. तसंच, 'अर्थकारणाचा विकास दर मोदींच्या कार्यकाळात कमी झाला. भाजपच्या जाहीरनामामध्ये काही वेग तर काही ठोस आश्वासन आहेत. २०१४, २०१९ ची आश्वासन का नाही पूर्ण केली? तुम्ही देशाची माफी मागा की तुम्ही देशाला फसवले.', असे आव्हान त्यांनी केले आहे.

तसंच, 'शेतकऱ्यांच्या जीवनात मोदी सरकारने विष कालवलं आहे. कुणाशी चर्चा नकरता मोदी सरकारने शेती कायदे केलेत. निर्यात बंदीमुळे शेती पिकाचे भाव पडलेत. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना सूद उगवत आहेत. शेती कायदे मागे घ्यावे लागले त्यामुळे मोदी सरकारचा अपमान झाला आहे. त्यामुळे सूद उगवला जात आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला अहवाल दिला पाहिजे. त्यांनी दिलेल्या आश्वासन का पूर्ण करू शकला नाहीत याचा अहवाल द्यावा. मोदींच्या काळात अर्थव्यस्थेचा दर मंदवला आहे. मतांच्या विभाजनासाठी भाजपने वंचितसारखा प्रयोग करण्यात आला आहे.' अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT