Sangli Satara Lok Sabha Election Candidate Chandrahar Patil vs Vishal Patil VS Sanjay Patil Saam TV
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha Constituency: कोण होणार सांगलीचा 'पाटील'? बंडखोरी पथ्यावर पडणार की महाराष्ट्र केशरी 'काकां'चा डाव पालटणार

Sangli Lok Sabha Election 2024 Result Battle - Chandrahar Patil vs Sanjay Patil vs Vishal Patil: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सांगली मतदारसंघाकडे आहे. विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चुरस निर्माण केली ती सांगलीच्या जागेने. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांना सांगलीत उमेदवारीच्या शर्यतीत आणून भाजपच्या संजय पाटील यांना धक्का दिलाच पण त्यानंतर महाविकास आघाडीचं जागावाटप ठरण्याआधी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून दुसरा धक्का दिला. मात्र विशाल पाटील यांनी बंड केल्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पहायला मिळाली. आता विशाल पाटील यांच्या बंडाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

सांगली काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. मात्र महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार दिला. त्यामुळे संपूर्ण देशात सांगली मतदारसंघ चर्चेत आला. विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना टक्कर देत चुरस निर्माण केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला हिरावला

२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपने हिरावून नेला. भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांचा २०१४ ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता. एकीकडे भाजपने देशात काही विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली असतानाही संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अपक्ष विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळाली.

मतदानाचा टक्का घसरला

२०१९ मध्ये संजयकाका पाटील यांना यांना ५,०८,९९५ मते मिळाली होती. त्यांचा १,६४,३५२ मतांनी विजय झाला होता. तर विशाल पाटील यांना ३,४४,६४३ मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देवून चुरस निर्माण केली होती. त्यांना ३,००,२३४ मतं मिळाली. सांगलीत यावेळी तिरंगी आणि चुरसची लढत असली तरी मतदानाचा टक्का मात्र ३.११ टक्क्यानी घसरला आहे. २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ६२.२७ टक्के मतदान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT