Sunanda Rajendra Pawar from Baramati  saam Tv
लोकसभा २०२४

Maharashatra Election: बारामतीच्या आखाड्यात नव्या एन्ट्रीनं ट्विस्ट; सुनंदा पवार यांनी घेतला उमेदवारी अर्ज

Baramati Loksabha Election Constituency : सुनंदा राजेंद्र पवार ह्या रोहित पवारांच्या आई आहेत. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर आता सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सागर आव्हाड, बारामती)

Baramati Loksabha Election Constituency Sunanda Pawar Candidate Nomination Form :

बारामती लोकसभा निवडणूक अधिकच रोचक बनत चाललीय. राज्यात बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चुरशीची असते. यंदा नणंदविरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतलाय. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतलाय.

भीमथडी जत्रा आणि बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुनंदा पवार यांचा जिल्हाभर संपर्क असून त्यांच्या कामातून त्यांनी ओळखलं जातं. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्याने सुनंदा पवार यांचे नाव आता चर्चेत आले आहे. दरम्यान बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे ह्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. जर सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज कोणत्या कारणामुळे बाद झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळल्या तर पर्यायी अर्ज म्हणून सुनंदा राजेंद्र पवार यांचा अर्ज भरण्यात आलाय. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या आईही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अजित पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून अधिकचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे, तसेच अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT