Supriya Sule News : आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीला कोणी मारतं का?; शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावले

Madha Loksabha Constituency News: आंबवडे येथे सुप्रिया सुळे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
Supriya Sule Wish to Sharad Pawar on His 83rd Birthday
Supriya Sule Wish to Sharad Pawar on His 83rd BirthdaySaam TV

अक्षय बडवे, पुणे|ता. १६ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काल आंबवडे येथे सुप्रिया सुळे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे (BJP) सरकार आहे. मात्र माझ्याविरोधात देण्यासाठी त्यांच्याकडे एकही उमेदवार नाही. म्हणूनच आमचा पक्ष फोडला. घरातीलच उमेदवार दिला. आज रोज शरद पवारांविरोधात बोलतात. पण बघा, आंब्याच्या झाडालाच दगडं मरतात, बाभळी ला कोणी मारतं का?" असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

"रोज पवार साहेबांवर (Sharad Pawar) बोलतात. पण टीका करायची असेल तर कामांवर करा. कामांवर बोलायला त्यांना काहीच नाही. आम्हाला भ्रष्टाचारी आहेत म्हणालेले. काय झालं त्या भ्रष्टाचाराचं. आम्ही कधीही भ्रष्टाचारं केला नाही. गरीब माणसांचे पैसे घेऊन आम्ही महाले नाही बांधली. गरीबांच्या सुख, दुःखात राहिलो," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule Wish to Sharad Pawar on His 83rd Birthday
Sangli Constituency : सांगलीत ठाकरे गटाला धक्का; विशाल पाटील लोकसभा लढण्याच्या निर्णयावर ठाम, आज शक्तिप्रदर्शन करणार

सरकार आल्यास कर्ज माफी...

"आमचे घर फोडले, पक्ष फोडला पण आम्ही रडलो का? आमच्यावर रडायचे नाही तर लढाईचे संस्कार आहेत. तुमच्या या लेकीमध्ये लढाईची ताकद आहे, असे म्हणत आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करू अशी घोषणा आमचे सरकार करेल," असे आश्वासनही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी दिले.

Supriya Sule Wish to Sharad Pawar on His 83rd Birthday
Udaysing Padvi News : एकनाथ खडसेंसोबत भाजपात की शरद पवार गटासोबतच; आमदार उदयसिंग पाडवी यांनी स्पष्ट केली भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com