Udaysing Padvi News : एकनाथ खडसेंसोबत भाजपात की शरद पवार गटासोबतच; आमदार उदयसिंग पाडवी यांनी स्पष्ट केली भूमिका

Nandurbar News : उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र पाडवी हे राष्ट्रवादीतच राहणार असून, आम्ही शरद पवार यांनी उभ्या केलेल्या पक्षाबरोबर राहणार असून, एकनाथ खडसे यांच्याबरोबर आम्ही कधीही जाणार नाहीत
Udaysing Padvi
Udaysing PadviSaam tv

सागर निकवाडे 

नंदूरबार : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असून यांच्यासोबत नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून कोण जाणार असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांनी खडसे (BJP) भाजपात गेले तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. (Live Marathi News)

Udaysing Padvi
Gadchiroli–Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज, अतिदुर्गम केंद्रांवरील कर्मचा-यांसाठी हेलिकॉप्टर तैनात

उदयसिंग पाडवी हे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र पाडवी हे राष्ट्रवादीतच राहणार असून, आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांनी उभ्या केलेल्या पक्षाबरोबर राहणार असून, एकनाथ खडसे यांच्याबरोबर आम्ही कधीही जाणार नाहीत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकनाथ खडसे भाजपात गेल्याने काहीही फरक पडणार नसून, आम्ही महाविकास आघाडी सोबत राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Udaysing Padvi
Malegaon Crime News : जुन्या वादातून तरुणाचा खून; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

त्यांच्या भूमिकेसोबत नाहीतच 

एकनाथ खडसे हे काही दिवसात भाजपात जाणार असं स्वतः एकनाथ खडसे बोलले असून, एकनाथ खडसे कार्यकर्त्यांची बोलून पक्ष प्रवेश करणार आहेत. मात्र आम्ही एकनाथ खडसे यांच्या भूमिकेसोबत नाही. त्यामुळे आम्ही खडसे यांच्याशी संपर्क करणार नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com