ravindra vadvi of bharat adivasi party to contest lok sabha election from nandurbar constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Nandurbar Constituency: भाजप, काँग्रेसनंतर नंदुरबारमध्ये भारत आदिवासी पार्टीचा उमेदवार जाहीर, निवडणुकीची रंगत वाढली

Nandurbar Lok Sabha Election 2024 : नंदुरबार जिल्ह्यात 13 मे राेजी मतदान हाेणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करु लागले आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Lok Sabha Election :

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले. त्यापाठाेपाठ आता भारत आदिवासी पार्टीने देखील निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री केली आहे. भारत आदिवासी पार्टीने रवींद्र वडवी यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने निवडणुकीची चूरस वाढली आहे. (Maharashtra News)

नंदुरबार मध्ये पत्रकार परिषद घेत ओबीसी राजकीय आघाडी तर्फे रवींद्र वडवी यांना पाठिंबा देण्यात आला. खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासींचे जल जंगल आणि जमीनचे अधिकार मजबूत करण्यासाठी आणि इतर आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी भारत आदिवासी पार्टी ही लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती उमेदवार रवींद्र वडवी यांनी दिली.

भारत आदिवासी पार्टीच्या एन्ट्रीने नंदुरबार लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रवींद्र वडवी यांनी आदिवासींचे प्रश्न साेडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि भविष्यात काय करणार याची माहिती पत्रकारांना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनही सज्ज

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT