Ravindra Dhangekar Saam Dgital
लोकसभा २०२४

Ravindra Dhangekar : पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकी काय आहेत कारणं?

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या आदल्या दिवशी पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात रविंद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी धंगेरकर यांच्यासह ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजपविरुद्ध आंदोलन केले होते.

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी सहकारनगर परिसरात मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असून पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ निर्माण झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. जवळपास मध्यरात्रीपर्यंत गोंधळ सुरू होता.

पोलीस स्थानकाबाहेर मतदानाच्या आधी असा गोंधळ सुरू झाल्यामुळे एकप्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याची गंभीर दखल घेऊन, जो कायदाने सुव्यवस्था बिघडवेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज रवींद्र धंगेकर यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५. लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ कलम १२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहीतेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून व घोषणा देवून आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT