Ravikant Tupkar Saam TV
लोकसभा २०२४

Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा; २ एप्रिलला बुलढाण्यातून अर्ज भरणार

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Ravikant Tupkar Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी अनेकजण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. काही राजकीय नेत्यांनी तर प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. अशातच शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) निवडणूक लढवणार असून येत्या २ एप्रिल रोजी निवडणुकीचा अर्ज दाखल करणार, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे. सातगाव भुसारी येथील निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे. (Breaking Marathi News)

शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेली आंदोलने राज्यभरात गाजली आहेत. फक्त बुलढाण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यातील बहुतांश शेतकरी तुपकर यांच्या पाठीमागे ठापमपणे उभे आहेत. आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

काही जणांनी तुपकर यांना निवडणूक लढवण्यासाठी वर्गणी देण्यास सुरुवात केली आहे. सध्या तुपकर संपूर्ण जिल्हा पिंजून काढत असून त्यांच्या सभांना लोकं तुफान गर्दी करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची चिन्हे सध्या मतदारसंघात दिसत आहेत.

बुलढाण्यात तीन टर्मपासून शिवसेनाचा खासदार

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मागील तीन टर्मपासून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हेच विजयी होत आले आहेत. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीमुळे यंदा बुलढाणा मतदारसंघातील उमेदवारीचे समीकरण बदलले आहे. प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटात असून यंदाची त्यांनी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार? याकडे देखील अनेकांच्या नजरा लागून आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT