Raj Thackeray On Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरे यांनी भरसभेत केलं कौतुक

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray On Ajit Pawar:

>> नितीन पाटणकर

''अजित पवार यांच्याबद्दल माझे अनेक मतभेद असती, मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. पुण्यात आज भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना त्यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.

शरद पवार यांना टोला लगावत ते म्हणाले, ''अजित पवार यांच्या आजपर्यंत सगळ्या गोष्टी मी पाहत आलोय. शरद पवार यांच्यासोबत राहून पण त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्यांनी (अजित पवार) कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं मला आठवत नाही.''

राज ठाकरे म्हणाले, ''1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून हे जातीवाद सुरु झाला. संभाजी बागेमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे, ते राम गणेश गडकरी कोण आहे, ते माहित आहे का? त्यांना वाटतं नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत.''

ते म्हणाले, ''जेम्स लेन प्रकरण आणले गेले. तुम्हाला जातीमध्ये गुंतवण्यासाठी. त्यामुळे शहरात काय होतेय. तुम्हाला कळत नाही. ⁠शहराचे काय वाटोळे झाले तर तुम्ही थंड असता, पण जातीचा विषय निघाला की पेटून उठता. ⁠निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करा. हे जर फतवे काढणार असतील तर मी पण आज फतवा काढतो. हिंदूंनी मोहोळ यांना मतदान करा. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा.''

याआधी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''पुण्याने अनेक विद्वान दिले. जगातील कंपन्यांना सल्लागार दिले. अशा पुण्यातची तुम्हाला (मुरलीधर मोहोळ) उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मी तुमचा प्रचार करायला आलोय. ⁠मी तुम्हाला चार गोष्टी सांगणार आहे. कित्येक वर्ष पुण्यात येतोय. तेव्हापासून मी सांगतोय, मुंबईची वाट लागायला काही काळ जावा लागला. पण पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. ⁠मला वाटले बीआरटी करावी बीआरटी करतोय. मला वाटले उड्डाणपूल तोडावा तोडून टाकला.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT