Raj Thackeray Thane Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोवर विकास होणार नाही, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Satish Kengar

Raj Thackeray Thane Sabha:

''ठाणे जिल्हा हा जगातील एकमेव जिल्हा असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे येत असतील. ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे ७ ते ८ महापालिका आहेत. हे का झालं ? याला कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. आज महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलता ते म्हणाले आहेत की, ''श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना माझं सांगणं आहे की, तुम्ही या लोंढ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडा. मेट्रो आणा किंवा अजून काही आणा, काही फरक पडणार नाही. सगळं जैसे थे राहणार. इथला मूळचा करदाता नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित राहणार.''

राज ठाकरे म्हणाले की, ''कोणी म्हणतील की हा संकुचित विचार आहे. अजिबात हा संकुचित विचार नाही, इथे अनेक वर्ष गुण्यागोविंद्याने नांदणारे अमराठी लोकं पण आपलेच आहेत. अट फक्त एकच, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. आम्ही जर तुमच्या राज्यात आलो तर तुमची भाषा शिकू, अर्थात आम्ही बाहेरच्या राज्यात येणार नाही.''

ते म्हणाले की, ही पहिली निवडणूक आहे, जिला विषय नाही. त्यामुळे एकमेकांना घाणेरड्या शिव्या देणं इतकंच सुरु आहे. बरं, एकीकडे काय रडारड सुरु आहे, वडील चोरले. मी फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन कधीच करणार नाही. आज तुम्ही आघाडी करून जे बसला आहात त्याकडे आधी बघा. माझे ७ पैकी ६ नगरसेवक यांनी खोके देऊन फोडले, अरे चोरले कशाला, मागितले असते तर देऊन टाकले असते, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा लपूनछपून काही नाही केलं. मी बाळासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगून आलो की पक्ष सोडतोय. त्यांनी मला मिठी मारली आणि विचारलं काय करणार आहेस, मी म्हणलं अजून काही ठरलं नाहीये. पण एक गोष्ट मनात होतं की, बाळासाहेब सोडून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाही. पक्ष काढेन, कितीही अडचणी येऊ देत, चढउतार येऊ दे माझा पक्ष मी चालवणार.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT