Raigad Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Raigad Lok Sabha: रायगड ब्रेकिंग! सुनील तटकरेंनी गड राखला; दुसऱ्यांदा दणक्यात विजय

Raigad Lok Sabha Election Result 2024 Sunil Tatkare Won: रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंचा दणक्यात विजय झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

Rohini Gudaghe

रायगडमध्ये सुनील तटकरेंनी गड राखला आहे. रायगडमधून अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचा दुसऱ्यांदा दणक्यात विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांच्यात काट्याची टक्कर पहायला मिळाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात लढत पहायला मिळाली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना 5,08,352 मतं मिळाली आहेत. त्यांना 82,784 मतांची आघाडी मिळाली आहे. २३व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना ६२ हजार ७३२ मतांची आघाडी मिळाली आहे. रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते पराभूत झाल्याने मोठा धक्का मानला जात आहे. गुलाल उधळून सुनील तटकरेंचा विजय साजरा केला जात (Lok Sabha Result) आहे.

विजयानंतर सुनील तटकरे समर्थकांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा केला आहे. अलिबागमध्ये सुनील तटकरे समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे, तर तटकरे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. सुनील तटकरे यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उल्हास दिसत (Raigad Lok Sabha Election Result 2024 ) आहे.

पक्षफूटीनंतर दोन्ही पक्षांची यंदा पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे अन् शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते (Anant Gite) यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची बनली होती. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार होते. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली होती. आज मात्र विजयाचं चित्र स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT