रायगड लोकसभा मतदारसंघात खरी लढत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात पहायला मिळाली. खरं तर पक्षफूटीनंतर दोन्ही पक्षांची ही पहिलीच निवडणूक, त्यामुळे निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते दोघांसाठीही लढाई अस्तित्वाची बनली आहे. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार असून दोन वेळच्या निवडणुकीत कडवी लढत पहायला मिळाली होती. यावेळी काट्याची टक्कर असणार की एकतर्फी विजय मिळवणार हे येत्या ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.
सुनील तटकरे सध्या अजित पवार यांच्या मर्जितले नेते मानले जातात. यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी कंत्राटदार म्हणून व्यवसाय केला. 1984 मध्ये तटकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते पवारांच्या मर्जितले नेते होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता अजित पवार गटासोबत गेले आहेत.
अनंत गिते सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत असून ६ वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री ए. आर अंतुले यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा पराभव केला होता. मात्र २०१९ निवडणुकीत त्यांना सुनील तटकरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
२०१९ ची निवडणूक शिवसेना-भाजप युती विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी अशी झाली. यावेळी सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा जवळपास ३२ हजार मंतानी पराभव केला आहे. अनंत गीते यांना 4,55,530 मतं मिळाली तर सुनील तटकरेंना 4,86,968 मतं मिळाली. २०१४ आणि २०१९ च्या दोघांनाही मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे यावेळीही काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनात मोठं बंड झालं. त्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातल्या चारपैकी तीन आमदारांनी शिंदे गटासोबत जाणं पसतं केलं. केवळ गुहागरचे आमदार भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत. शेकपाचे अलिबागचे आमदार असलेले धैर्यशील पाटील यांनीही भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे ६ पैकी पाच आमदार महायुतीकडे आहेत. महाविकास आघाडीकडे केवळ १ जागा आहे. तरीही चुरशीची लढत झाल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.