Rahul Gandhi Criticized PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: 'मोदींच्या हातातून निवडणूक निसटली, त्यांनी ठरवलंय ४- ५ दिवसात...', राहुल गांधीनी युवकांना केलं सावध

Loksabha Election 2024: पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहेत, असा दावा भाजप नेते करत आहेत. अशातच ४ जूननंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत मोदींच्या प्रचाराला भुलू नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. ९ मे २०२४

देशभरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहेत, असा दावा भाजप नेते करत आहेत. अशातच ४ जूननंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत मोदींच्या प्रचाराला भुलू नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

"देशाचे युवक हे देशाची ताकद आहेत. नरेंद्र मोदींच्या हातातून निवडणूक निसटत चालली आहे. त्यांनी तुमचे लक्ष भटकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार -पाच दिवसात काहीतरी ड्रामा करणार आहेत. मात्र तुम्ही मुद्द्यांपासून भटकू नका. बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेले २ कोटी रोजगार देतील. ते खोटे बोलले. चुकीची जीएसटी लावली. नोटबंदी केली आणि अदानी अंबानीसारख्या लोकांसाठी काम केले," अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

"४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. आमची गॅरंटी आहे की १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती सुरू करणार आहोत. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला भुलू नका, तुमच्या मुद्द्यांवर ठाम राहा. इंडियाचा आवाज ऐका, तिरस्कार नको, नोकरीला स्विकारा... असे आवाहनही राहुल गांधी यांनी यावेळी केले.

दरम्यान, महायुतीच्या नेत्यांच्य प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दिनांक १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये भव्य रोड शो होणार आहे. त्यानंतर १७ मे ला त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या सभेतून पंतप्रधान कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT