Rahul Gandhi News SAAM TV
लोकसभा २०२४

Rahul Gandhi Net Worth: राहुल गांधींकडे स्वतःची कार नाही, कॅश फक्त ५५ हजार रुपये; एकूण संपत्ती किती?

Wayanad Lok Sabha Constituency: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Pramod Subhash Jagtap

Rahul Gandhi Net Worth Property:

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे २० कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राहुल गांधींची संपत्ती किती?

वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ५५ हजार रुपये रोख रक्कम, २६ लाखांचे बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात सव्वा ४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडे ४ लाखांचे सोन्याचे दागिने, हरियाणातील गुरुग्राममध्ये ९ कोटी रुपये किमतीचे कार्यालय आहे. तसेच राहुल गांधी यांच्याकडे स्वतःची कार नसल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या ॲनी राजा रिंगणात आहेत. ॲनी राजा या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. त्या सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आहेत. ॲनी राजा यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT