Nagpur Lok Sabha Election: नागपूरमधील भाजप कार्यकर्ते स्थानिक नेत्यांवर नाराज, नितीन गडकरींना पोस्टरद्वारे घातली साद

Nitin Gakari Banner In Nagpur: नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने नितीन गडकरी यांना तिकीट दिलं आहे. "नितीनजी आपसे बैर नहीं-माजी नगरसेवक नगरसेविकाओ की खैर नहीं", अशा आशयाचे फलक रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
Nitin Gakari Banner
Nitin Gakari Banner In NagpurSaam Tv
Published On

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

Maharashtra Lok Sabha Election 2024

नागपूरमध्ये (Nagpur Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मतदारांची नगरसेवकांविषयी नाराजी जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून फलक लागले आहेत. या फलकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.  (latest politics news)

नागपूरमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तिकीट दिलं आहे. ते तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत (Lok Sabha Election) आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे भाजपचा बालेकिल्ला म्हणून पाहिलं (Nitin Gadkari Banner In Nagpur) जातं. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे. आता त्यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरूवात झाली आहे.  ('साम टीव्ही'चं

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"नितीनजी आपसे बैर नहीं- माजी नगरसेवक नगरसेविकाओ की खैर नहीं", अशा आशयाचे फलक रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिक मूलभूत समस्यांमुळे त्रस्त (Nagpur Lok Sabha Election) आहेत. मात्र, त्यांच्या या समस्यांकडे माजी नगरसेवक- नगरसेविकांचे लक्ष नसल्याचं यातून सांगण्यात आलं आहे.

"जनता त्रस्त, माजी नगरसेविक- नगरसेविका मस्त" असा फलकांवर उल्लेख करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचे फोटो आणि कमळ चिन्हाचा फलकांवर वापर केला गेला (Maharashtra Politics) आहे. त्यामुळे हे बॅनर भाजपच्याच (BJP) कार्यकर्त्यांनी लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या फलकाच्या खाली 'बीजेपी कार्यकर्ताओ द्वारा आपको समर्पित' असं लिहिण्यात आलं (Nitin Gadkari Banner) आहे.

Nitin Gakari Banner
Ahmednagar Politics : भाषा किंवा शिक्षणावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही; सुजय विखेंनी लंकेंना दिलेल्या आव्हानाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

'सामुहिक जनता द्वारा चुनाव का सामुहिक निषेध' असाही उल्लेख या फलकांवर करण्यात आला (Maharashtra Lok Sabha Election 2024) आहे. दीड वर्षाहून अधिक कालावधी झालाय. मनपामध्ये प्रशासक आहेत, तरीही सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात दुर्लक्ष होतंय. त्यामुळे झालेला नागरिकांचा संताप या फलकांच्या माध्यमातून निदर्शनास येत (Lok Sabha Election) आहे. नागपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याच दिसत आहे.

Nitin Gakari Banner
Maharashtra Politics: अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; 'शिवाजी पार्क'साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच! इनवर्ड नंबरमुळे पेच सुटणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com