मी राजवाड्यातील अस्सल निंबाळकर आहे, कोणी तोतया निंबाळकर नाही अशा शब्दात भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या घणाघात केला. जनाधार नसलेल्या माणसाला भाजपने उमेदवारी कशी काय दिली असा सवाल ही रघूनाथराजे नाईक निंबाळकर (Raghunathraje Naik Nimbalkar) यांनी केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
महायुतीने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दिल्याने अकलूजचे नेते विजयसिंह माेहिते पाटील गटाने महायुतीपासून फारकत घेतली. या गटाने महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली. त्यानंतर मविआने धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे आता माढा लाेकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी चांगलीच फटके बाजी करत भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रघुनाथराजे नाईक निंबाळकर भाषणात म्हणाले मी राजवाड्यातील अस्सल निंबाळकर आहे, कोणी तोतया निंबाळकर नाही. जनाधार नसलेल्या माणसाला भाजपने उमेदवारी कशी काय दिली असा सवाल ही रघूनाथराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.