Pune Bogus Voting Saam Tv
लोकसभा २०२४

Pune Voting: पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

Pune Lok Sabha Election: पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदान ओळखपत्रावर अनुक्रमांक एक आहे. मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये (Pune) बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले आहे. अरविंद शिंदे (Arvind Shinde) असं काँग्रेसच्या शहराध्यक्षांचे नाव आहे. माझ्या नावाने अगोदरच कुणीतरी मतदान करून गेल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप केला आहे. मतदान केलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड वेगळं आहे. माझ्या नावाने मतदान कसं ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर त्यांनी टेंडर वोट केलं. माझ्या नावाने बोगस मतदान (Bogus Voting) करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असी मागणी त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदान ओळखपत्रावर अनुक्रमांक एक आहे. मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे आहे. माझ्या नावाने मतदान कसं असा सवाल अरविंद शिंदे यांनी केला आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर अरविंद शिंदे यांनी टेंडर वोट केले. आपल्या नावाने बोगस मतदान झाल्यामुळे अरविंद शिंदे चांगलेच संतप्त झाले.

साम टीव्हीशी बोलताना अरविंद शिंदे यांनी सांगितले की, 'मतदान केंद्रावर आले असता जेव्हा मी माझे ओळखपत्र दाखवले तेव्हा माझ्या नावाने मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. मी त्यांना विचारले जर माझा फोटो आहे माझ्या बोटावर शाई नाही तर माझ्या नावाने मतदान कसं झालं. रिटर्निंग ऑफिसर ऐवढे रूड आहेत. ज्यावेळी आमच्या पोलिंग एजंटने हरकत घ्यायचा विचार केला तर त्यांनी हरकत घेऊन दिली नाही. ते फक्त अनुक्रमांक पुकारतात. तुम्ही अनुक्रमांकासोबत मतदान करायला आलेल्याचे नाव पुकारले पाहिजे. तर सर्व पोलिंग एजंटला कळाले असते. पण पोलिसांमार्फत कोणत्याही पोलिंग एजंटला बोलून दिले जात नाही.', असा आरोप अरविंद शिंदे यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, 'मी लाइनमध्ये उभे असताना गेल्या १५ मिनिटांपासून हे सर्व पाहत होतो. जेव्हा माझी मतदान करणाची वेळ आली तेव्हा कळाले माझ्या नावाने मतदान झाले आहे. म्हणून मी चँलेज मतदान केले. त्यासाठी जी प्रोव्हिजन असते ते मी पूर्ण केली. यानुसार, १७ बीचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर ते आपल्याला बॅलेट पेपर देतात. त्यावर मतदान करून ते सील करून त्यांच्या ताब्यात द्यावे लागतात.' तसंच, 'अत्यंत चुकीच्या पद्धतीने संपूर्ण मतदान यादीमध्ये कोणाची नावं इकडे तिकडे आहेत. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्या. ऐवढा घोळ आहे नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे.', असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Singham Again Collection Day 16: 'सिंघम अगेन'ची धमाकेदार एन्ट्री, १६ व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, कलेक्शन किती झालं?

Hingoli Vidhan Sabha : भाजपचे निम्मे कार्यकर्ते सोबत; हिंगोलीत अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक खुलासा

Congress Vs BJP : नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शोदरम्यान काँग्रेस-भाजप आमनेसामने, कार्यकर्त्यांत राडा

SCROLL FOR NEXT