Lok Sabha Elections 2024 Yandex
लोकसभा २०२४

Lok Sabha Elections 2024: पुण्यात २ दिवस बेकायदेशीर जमाव, सभा अन् बैठकांना बंदी, कारण काय?

Prevention Of Illegal Mobs In Shirur: पुण्यामध्ये १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये १३ मे रोजी मतदान (Pune Lok Sabha) पार पडणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे. १३ मे रोजी पुणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसंच सार्वजनिक सभा, बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस सहआयुक्त यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर आणि हडपसर विधानसभा मतदार (Prevention Of Illegal Mobs In Shirur) संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

आता पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता बेकायदेशीर जमावास प्रतिबंध करण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त यांनी यासंबंधित आदेश दिले (Pune News) आहेत. यामुळे आता सार्वजनिक सभा, बैठका घेण्यास मर्यादा पडणार आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जमावास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अमोक कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार (Maharashtra Election) मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरसीशी लढत होत आहे. पुण्यात ११ मे पासुन बेकायदेशीर जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT