prakash shendage opposes prakash ambedkar on supporting supriya sule and vishal patil Saam Digital
लोकसभा २०२४

OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

Vanchit Bahujan Aghadi News : जर प्रस्थापित मराठा नेत्यांना भावनेच्या भरात पाठिंबा देत असतील तर तुमच्या धोरणांचा आणि पक्षाचा विचार करावा लागेल इशारा ओबीसी बहुजन पार्टीने दिला.

विजय पाटील

Sangli Constituency :

वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील यांना लोकसभा निवडणूकीत दिलेल्या पाठींब्यावरून ओबीसी नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे ? असा संतप्त सवाल ओबीसी बहुजन पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे म्हणाले वंचितने घेतलेला निर्णय हा राज्यातील ओबीसी जनतेच्या दृष्टीने धक्कादायक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. आंबेडकरांचा हा निर्णय आंबेडकर वाद व आरक्षण वाद विरोधात असल्याची भावना देखील निर्माण झाली असल्याची टीका शेंडगे यांनी केली आहे. ते सांगली येेथे बोलत होते.

त्याच बरोबर ओबीसी नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आंबेडकर जर प्रस्थापित मराठा नेत्यांना भावनेच्या भरात पाठिंबा देत असतील तर तुमच्या धोरणांचा आणि पक्षाचा विचार करावा लागेल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण गायकवाड आणि मच्छिद्र भोसले आदी नेत्यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पॅरामेडिकल पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

१२ वर्षाच्या मुलीवर २०० पुरूषांचा ३ महिने बलात्कार, देहविक्रीच्या दलदलीत चिमुकली कशी अडकली? मुंबई हादरली

Bhandara Crime : भंडारा दुहेरी हत्याकांडाने हादरले; सहा तासांत मारेकरी ताब्यात

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ सवयी अंगीकारा आणि जीवनात मिळवा मोठे यश

SCROLL FOR NEXT