Vanchit Bahujan Aaghadi Manifesto For Loksabha Election 2024 Saamtv
लोकसभा २०२४

VBA Manifesto: शेती, शिक्षण, केंद्रस्थानी.. वंचित आघाडीकडून लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Vanchit Bahujan Aaghadi Manifesto For Loksabha Election 2024: वंचित आघाडीने २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शेती, शिक्षणला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. १५ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज वंचित आघाडीने २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

वंचितच्या जाहीरनाम्यात काय काय आश्वासने?

एनआरसी, सीएए कायदा असंवैधानिक. या कायद्यांमुळे हिंदूतील भटक्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. या लोकांच्या अधिवासाची कोणतीच नोंद नसल्याने त्यांचं नागरिकत्व धोक्यात येईल, असे म्हणत याला विरोध करण्याची भूमिका वंचितने आघाडीने घेतली आहे.

तसेच शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केला जाईल. त्याचे उल्लंघन करणाऱ्याला आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल करू. शिक्षणाच्या धोरणाला कथित शिक्षण महर्षींच्या कैदेतून मुक्त करू.शिक्षणासाठीची तरतूद 3 टक्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत वाढवू. सार्वजनिक क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणि विक्रीला थांबवू. शेतीवर आधारीत उद्योगांना चालना देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

त्याचबरोबर कापूस, सोयाबीनला बाजारभाव मिळत नाही. सत्तेत आलो तर कापसाला किमान 9 हजार तर सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव देऊ. शेतीला उद्योगाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही या जाहीरनाम्यामधून देण्यात आले आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

SCROLL FOR NEXT