pm narendra modi to address poll rally in karad today know the traffic diversion and parking  Saam Digital
लोकसभा २०२४

PM Modi In Karad : उदयनराजेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज कराडमध्ये सभा; जाणून घ्या वाहतूक बदलासह पार्किंगची व्यवस्था, Video

केवळ रुग्णवाहिकेसाठी सैदापुर कॅनॉल-गणपती मंदिर-ओगलेवाडी रोड हा मार्ग बंद राहील. त्याऐवजी सैदापुर कॅनॉल-बनवडी फाटा-गजानन हौसिंग सोसायटी-गणपती मंदिर- ओगलेवाडी चौक-करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा.

Siddharth Latkar

Satara Constituency :

सातारा लाेकसभा मतदारसंघातीच महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांच्या प्रचारार्थ आज (साेमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांची सैदापूर (ता. कराड) येथे दुपारी एक वाजल्यानंतर जाहीर सभा हाेणार आहे. या सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आज (29 एप्रिल) मध्यरात्रीचे १ वाजेपासुन सभा संपेपर्यंत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसुचना पारित केली आहे. या अधीसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

वाहतुकीकरीता बंद करण्यात येणारे मार्ग

सैदापुर कॅनॉल ते ओगलेवाडी रोड गणपती मंदिर हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुला कोणतेही वाहन पार्क करता येणार नाहीत.

सुरली घाट विटा मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडकडे कोणत्याही प्रकारचे जड वाहन, एसटी बस यांना करवडी फाटा-ओगलेवाडी-सैदापूर कॅनॉल हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील.

सैदापुर कॅनॉल-कृष्णा सर्कल-विजय दिवस चौक-भेदा चौक-पोपटभाई पेट्रोलपंप-कोल्हापुर नाका-ढेबेवाडी फाटा-कृष्णा हॉस्पिटल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

कृष्णा हॉस्पिटल-ढेबेवाडी फाटा - खरेदी विक्री पेट्रोलपंप कोल्हापुर नाका युटर्न-कोयनामोरी-म. गांधी पुतळा - पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल-सैदापुर कॅनॉल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

चिपळूण-पाटण-ढेबेवाडी-उंडाळे-तासगाव-इस्लामपुर या बाजुकडुन येणारी व विटा, औंध-पुसेसावळी बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कराड शहरात प्रवेश न करता हायवे वरुन तासवडे-शिरवडे- मसुर- शामगाव घाट मार्गे विटा-औंध-पुसेसावळी बाजुकडे जातील.

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा

सैदापुर कॅनॉल-गणपती मंदिर-ओगलेवाडी रोड हा मार्ग बंद राहील. त्याऐवजी सैदापुर कॅनॉल-बनवडी फाटा-गजानन हौसिंग सोसायटी-गणपती मंदिर- ओगलेवाडी चौक-करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग

विटा सुरली घाट मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडमध्ये येणारी एसटी, जड वाहने ही मसुर-उंब्रज- तासवडे टोल नाका-हायवे ने कोल्हापुर नाका मार्गे कराड मध्ये येतील. ओगलेवाडी-रेल्वे स्टेशन कडील वाहने ही ओगलेवाडी चौक-एमएसईबी बनवडी-बनवडी फाटा-कोपर्डे- सहयाद्री साखर कारखाना-शहापुर फाटा-शिरवडे-तासवडे-वहागाव मार्गे हायवे ने कोल्हापुर नाका मार्ग कराड मध्ये येतील.

वाहनांची पार्किंग व्यवस्था

चारचाकी वाहने - सातारा बाजुकडुन येणारी चारचाकी वाहने ही उंब्रज-मसुर-सहयाद्री साखर कारखाना-कोपर्ड-बनवडी फाटा-वेणुताई चव्हाण कॉलेज-शासकीय इंजिनिअरींग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत.

सांगली जिल्हयातुन विटा-कडेगाव मार्गे व सातारा जिल्हयातुन औंध-पुसेसावळी यामार्गे येणारी चारचाकी व दुचाकी वाहने करवडी फाटा-ओगलेवाडी मार्गे गजानन हौसिंग सोसायटी येथील सुर्या फर्निचर पासुन पुर्वेस असणा-या अमर जाधव यांचे (शेतात) मैदानावर पार्क करतील.

चिपळुण, पाटण, ढेबेवाडी, उंडाळे बाजुकडुन सभेकरीता येणारी चारचाकी वाहने ही कोल्हापुर नाका युटर्न- कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल-एसजीएम कॉलेज पाठीमागे हॉलीफॅमिली येथील पैसा फंड व लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत.

दुचाकी वाहने - इस्लामपुर, तासगाव, उंडाळे, ढेबेवाडी, पाटण या भागातून सभेकरीता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापुर नाका यूटर्न-कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत. सातारा-उंब्रज बाजुकडुन येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज विदयानगर येथे पार्क करावीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतूक ज्या-ज्या ठिकाणवरुन वळविण्यात आली आहे अथवा बंद करण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तरी वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शेख यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

Dum Aloo: घरच्या घरी पाहुण्यांसाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT