PM Narendra Modi Speech Saamtv
लोकसभा २०२४

PM Modi Speech: 'इंडिया आघाडी' स्वार्थासाठी एकत्र; काँग्रेस विकासाच्या वाटेतली भिंत.. नांदेडच्या सभेत PM मोदी कडाडले!

PM Narendra Modi Sabha Nanded: महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. २० एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत सेवालाल महाराज, हर महादेव, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात NDA च्या बाजूने मतदान झाले आहे. ज्या लोकांनी मतदान केले नाही, त्यांनी मतदान करा, कोणालाही करा पण मतदान करा. देशाचे भविष उज्वल करा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इंडिया आघाडीवर निशाणा..

"इंडिया आघाडीचे लोक भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही. काँग्रेसने आधीच पराभव मान्य केला आहे. इंडिया आघाडीचे 25 टक्के उमेदवार असे आहेत की जे एकामेकांच्या विरुद्ध लढत आहेत. इंडिया आघाडीला धडा शिकवणे गरजेचे आहे. एव्हढा मोठा देश कोणाच्या हातात द्यायचा, हे कोणी सांगायला तयार नाहीत," असा खोचक टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

राहुल गांधींवर निशाणा...

"राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वायनाड मतदार संघ देखील सोडुन पळतील. 4 जून नंतर 100 टक्के हे लोक एकमेकांचे कपडे फाडून घेतील. स्वातत्र्यप्राप्तीनंतर आम्ही पहिल्यांदा शौचालय आणि इतर योजना दिल्या. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार ही मोदींची गॅरंटी आहे," असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT