Sanjay Raut
Sanjay Raut Press ConferenceSaam Tv

Sanjay Raut : पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील : संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut on Prime Minister Post : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधानपदासाठी अनेक नावांची चर्चा होत आहे. त्यात आता संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलंय.
Published on

विजय पाटील

पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान पदासाठी अनेक नावांची चर्चा होत आहे. त्यात आता संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलंय.

Sanjay Raut
Sanjay Raut News: नवनीत राणांवरील टीका संजय राऊतांना भोवणार? महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नावेही सुचवण्यात आली होती. पंतप्रधानपदाच्या या शर्यतीत राऊतांनी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत?, असा सवाल उपस्थित केला.

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही, अशा शब्दांत राऊतांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

विशाल पाटील हे समजुतदार आहेत

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी विशाल पाटील यांच्यावर देखील भाष्य केलं. विशाल पाटील हे समजुतदार आहेत. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे.विशाल पाटलांच्या मनात देखील शिवसेने बदल प्रेम आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काल महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत देखील उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी राऊतांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत काँग्रेस आणि ठाकरेसेनेचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. त्यावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut
Bengaluru Crime : काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची भोसकून हत्या! कुठे? कधी? कारण काय? CCTV मध्ये थरार कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com