PM Modi Rally In MP ANI
लोकसभा २०२४

PM Modi : आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू: पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

PM Modi Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील मुरैना येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेससाठी कुटुंब सर्वस्व असल्याची टीका मोदींनी केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pm Modi Slams Congress In Madhya Pradesh : लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावलाय. पंतप्रधान मोदींनी आज मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका सभेला संबोधित केलं. या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेससाठी कुटुंब महत्त्वाचं आहे. त्यांनी मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्याच्या रांगेत बसवलं होतं.

' ते प्रसिद्ध, लोकप्रिय आहेत म्हणून ते आम्हाला शिवीगाळ करतात, पण आम्ही त्यांच्या शिव्याही सहन करू आणि भारत मातेची सेवाही करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस विकास करत नाही.

चंबलचे लोक काँग्रेसचा काळ कधीच विसरू शकत नाहीत. काँग्रेसने चंबलची ओळख वाईट कायदा सुव्यवस्था अशी करून ठेवली होती. काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात मध्यप्रदेश राज्याला एका आजारी राज्यांच्या रांगेत उभं केलं होतं. काँग्रेससाठी कुटुंबचं सर्वस्व आहे.

पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. 'तुम्ही ऐकलेच असेल की आजकाल काँग्रेसचे राजपुत्राला दररोज मोदींचा अपमान करतात त्यात त्यांना मजा येते. ते काहीही बोलत असतात. मी सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका केल्याने जनता दु:खी आहेत. माझी सर्वात मोठी विनंती आहे की, तुम्ही दुःखी होऊ नका.

ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या टीका सहन करण्यासाठीच आम्ही जन्मालो आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही. पण काँग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व आहे. यात सर्वात जास्त ज्यांनी योगदान दिलं आहे, कष्ट केलेत. ज्यांनी देशासाठी सर्वात जास्त त्याग केला, त्याला मागे ठेवण्याचे धोरण काँग्रेसचं असल्याचं मोदी म्हणालेत.

आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांनी कर्नाटकातील सर्व मुस्लिम समाजातील लोकांना ओबीसी म्हणून घोषित केले आहे. म्हणजे तिथे पूर्वी शिक्षणात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायचं. पण काँग्रेसने ओबीसी प्रवर्गात इतके नवीन लोक आणले त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळायला हवे होते, त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने काढून घेतले गेल्याची टीका नरेंद्र मोदींनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT