Pawan Singh Expelled From BJP  SAAM TV
लोकसभा २०२४

Pawan Singh Expelled : लोकसभा निवडणूक काळातच पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपची मोठी कारवाई

Pawan Singh Latest News : भाजपने पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Pramod Subhash Jagtap

भाजपने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे शिल्लक असतानाच भाजपने ही मोठी कारवाई केली आहे.

पवन सिंग (Pawan Singh) हे काराकाट लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. पवन सिंग यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपचे बिहारमधील प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पवन सिंग हे लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अधिकृत उमेदवाराविरोधात लढत आहेत. त्यांची ही कृती पक्षविरोधी आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार त्यांना भाजपतून बडतर्फ केले जात आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली होती. पवन सिंग यांना पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. त्यांनीही पक्षाचे आभार मानले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. भाजपने त्यांच्या जागी एसएस अहलूवालिया यांना आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. तृणमूल काँग्रेसने येथून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना मैदानात उतरवलं आहे.

पवन सिंग यांनी काही दिवसांनी काराकाटमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. लोकसभा निवडणूक काराकाट बिहारमधून लढवण्याचा निर्धार केला आहे, असं सिंग म्हणाले होते. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघासाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात १ जूनला मतदान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मॅट्रोमोनी साइटवर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार; प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?

Revised ITR: रिवाइज्ड आयटीआर म्हणजे काय? कोणाला भरता येतो? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, बच्चू कडू आक्रमक

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

SCROLL FOR NEXT