pankaja munde reaction on bajrang sonawane and jyoti mete beed constituency lok sabha election 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Beed Constituency : बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करणं पंकजा मुंडेंनी टाळलं, कारण ही सांगितलं

मी संपूर्ण प्रचारात विरोधकांवर काही बोलणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावे मी माझं काम करेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांच्यावर बोलणं टाळल आहे.

विनोद जिरे

Beed Lok Sabha Constituency :

बीड लोकसभा मतदारसंघात समाेर उमेदवार कोणीही असो निवडणूक तेवढ्याच गांभीर्याने घेतली पाहिजे असं मी समजते. ही निवडणूक विकासावर जावी अशी भावना व्यक्त करताना महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी याचे कारण सांगताना बीड जिल्ह्याच्या इतिहासात ही संधी जिल्ह्याला आल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे (bajrang sonwane) यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर झाली. या मतदारसंघात आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा संघर्ष पेटण्याची शक्यता सध्यातरी दिसून येते आहे.

बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते बीड जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना समोरचा उमेदवार कोणीही असो निवडणूक तेवढ्याच गांभीर्याने घेतली पाहिजे असं मी समजते. ही निवडणूक विकासावरच जावी असं मला वाटतं कारण बीड जिल्ह्याच्या इतिहासात ही संधी जिल्हाला आली आहे.

ज्योती मेटे (jyoti mete) यांच्या उमेदवारीवर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. त्यांची भूमिका राज्यभर वेगळी जाण्याची की फक्त बीड जिल्ह्याची आहे. ती का आहे हे जनतेला पटवून द्यावे लागेल. मी संपूर्ण प्रचारात विरोधकांवर काही बोलणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावे मी माझं काम करेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांच्यावर बोलणं टाळल आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

SCROLL FOR NEXT