Rahul Gandhi  Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: महिलांना एक लाख रुपये, 30 लाख सरकारी नोकऱ्या; राहुल गांधींनी मध्य प्रदेशात दिली मोठी आश्वासने

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील सिवनी येथे जाहीर सभेला संबोधित केले.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi News :

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील सिवनी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.

ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर एससी, एसटी आणि मागासवर्गीय महिलांच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. राहुल गांधी म्हणाले की, आमच्या जाहीरनाम्यात तीन ते चार क्रांतिकारक पावले नमूद करण्यात आली आहेत. ज्यात एससी, एसटी, मागासलेल्या आणि गरीब कुटुंबातील महिलांना 1 लाख रुपये देणे समाविष्ट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसने मांडला मतदारसंघातून माजी मंत्री आणि आमदार ओंकार सिंग मरकाम यांना उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना स्पर्धा देणार आहेत. सभेला संबोधित करताना काँग्रेसने आशा आणि अंगणवाडी सेविकांचे पगार दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी म्हणाले, "केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्याची पद्धत बंद करू आणि सरकारी क्षेत्रात 30 लाख भरती करू.'' (Latest Marathi News)

राहुल गांधी म्हणाले, "देशातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात एक वर्षाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आम्ही नवीन कायदा आणू, ज्या दरम्यान त्यांना एक लाख रुपये भत्ता मिळेल.''

ते म्हणाले की, ''शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य एमएसपी मिळावा यासाठी काँग्रेस सरकार कायदा करणार आहे. आदिवासींना त्यांच्या भूमीपासून दूर करण्यासाठी आणि जल, जंगल आणि जमिनीवरील त्यांचा हक्क हिरावून घेण्याच्या उद्देशाने भाजप मुद्दाम आदिवासींना आदिवासी ऐवजी वनवासी म्हणत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

SCROLL FOR NEXT