Raju Patil Saam tv
लोकसभा २०२४

Raju Patil: आता खऱ्या मनाने आम्ही उपस्थित राहिलोत, श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमात राजू पाटील खुलूनच बोलले...

Raju Patil On Shrikant Shinde: मोदी चांगलं काम करतायत, चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Raju Patil On Shrikant Shinde:

>> अभिजित देशमुख

मोदी चांगलं काम करतायत, चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत. जे कोत्या मनाचे आहेत त्यांनी आमच्या साहेबांना विचारलं नाही, त्यांना त्यांच्यात कमीपणा वाटला. राज साहेब मोठ्या मनाचे आहेत. जे कोत्या मनाचे आहेत, त्यांना जमलं नाही, असा टोला राजू पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आज श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. यातच बोलताना ते असं म्हणाले आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी कार्य अहवाल दाखवला. त्यांनी जी विकासकामे केली, त्याबद्दल शंभर टक्के त्यांच्या समर्थन आहे. त्यांनी चांगलंच काम केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी दिला. खासदार शिंदे आणि आमच्यात लूटपुट होती. मात्र शिंदे साहेबांशी कधी लिंक तोडली नाही. तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता. प्रत्येकाने तो करायला पाहिजे, असं राजू पाटील म्हणाले.

ते म्हणाले, याचा वरिष्ठांना देखील त्रास व्हायचा, तो झाला. बीत गयी, सो बात गयी, आता खऱ्या मनाने आम्ही उपस्थित राहिलोत. त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही. कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे मनसे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही.

कल्याण भिवंडीचे जे उमेदवार आहेत, त्यांचे पक्ष सोडून गेले. त्यांचे कामाचे करणार नव्हतो. श्रीकांत शिंदे यांना तशी हनुमान चालीसा पाठ आहे. तशाच मतदारसंघातील समस्या देखील पाठ आहेत. श्रीकांत शिंदे यांचा शंभर टक्के काम करणार यंदा श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, असा विश्वास मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलून दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?

Revised ITR: रिवाइज्ड आयटीआर म्हणजे काय? कोणाला भरता येतो? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, बच्चू कडू आक्रमक

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT