nilesh rane criticises vinayak raut vaibhav naik ratnagiri sindhudurg lok sabha election 2024
nilesh rane criticises vinayak raut vaibhav naik ratnagiri sindhudurg lok sabha election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg Constituency: नारायण राणेंचा कोकणात झंझावात, विनायक राऊतांना अर्ध्या गाड्या मुंबईतून आणाव्या लागल्या : निलेश राणे

अमोल कलये

Nilesh Rane :

रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात (ratnagiri sindhudurg lok sabha constituency) महायुतीचा उमेदवार माेठ्या मताधिक्याने निवडून येणार हे निश्चित आहे. नारायण राणे यांचा मतदारसंघात महिनाभर झंजावात सुरू आहे. राणे यांच्या सभेला मोठ्या प्रतिसाद मिळत आहे असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नावाला सुद्धा शिल्लक नसल्याची टीका निलेश राणेंनी केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

निलेश राणे म्हणाले विनायक राऊत यांचे शक्तिप्रदर्शन म्हणजे काय बाराशे लोक इतकेच. एक काळ होता शिवसेनेचा ज्यावेळेला मैदान भरत होते पण आता ठाकरे गटाला अंगण सुद्धा भरत नाही. विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरताना अर्ध्या गाड्या या मुंबईतून आणल्या गेल्या होत्या असा दावा राणेंनी केला.

दरम्यान वैभव नाईक यांच्यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले वैभव नाईक सारख्या रिकामटेकडा आमदार महाराष्ट्रात नाही. ते काय बोलतात याला आम्ही काडीची किंमत देत नाही. वैभव नाईक यांच्या विरोधात बोलणं म्हणजे आमचा वेळ घालविण्यासारखे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान महायुतीमधील वरिष्ठ आम्हाला जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही पावलं उचलू असेही रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातील उमेदवारीवरुन राणेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT