navneet ravi rana meets abhijeet adsul on eve of amravati lok sabha election 2024
navneet ravi rana meets abhijeet adsul on eve of amravati lok sabha election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Amravati Political News : 'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो'; अखेर राणा आणि अडसूळ यांचं मनोमिलन?

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati Constituency :

अमरावती लाेकसभा मतदारसंघात राजकीय घडामाेडींचा वेग वाढू लागला आहे. अनेक वर्षानंतर अखेर अडसूळ आणि राणा या दाेन नेत्यांची आज (बुधवार) अमरावती येथे भेट झाली. राणा दाम्पत्याने अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत निवडणुकी विषयी सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

अमरावती लाेकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहे. या मतदारसंघात आज राणा दाम्पत्य अडसूळ यांच्या भेटीला गेल्या. या दाेघांमधील वाद मिटला की काय असा सवाल आता उपस्थित हाेऊ लागला आहे.

या भेटीनंतर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो अशी सूचक प्रतिक्रिया अभिजित अडसुळ यांनी दिली आहे. अडसुळ म्हणाले अजून आम्ही काहीही निर्णय घेतलेलला नाही. लवकरच आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ.

अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलो आहे. आम्ही सर्व एकत्र आहे आणि एकत्र मिळून आम्ही काम करू. जो राम को लाये है हम उनको लायेगे असे म्हणत मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सोबत काम करू अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान राणा दाम्पत्याने आज भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील भेट घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

Today's Marathi News Live: दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

Raj Thackeray: आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

SCROLL FOR NEXT