Ajay Boraste On Hemant Godse
Ajay Boraste On Hemant Godse Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha Election 2024: नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेच उमेदवार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजय बोरस्तेंचा दावा

Priya More

नाशिकमधील महायुतीचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 'हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार राहतील.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर अजय बोरस्ते यांनी हे वक्तव्य केले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Loksabha Election 2024) महायुतीकडून (Mahayuti) अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसपूस सुरू आहे. पण आता नाशिकचा तिढा लवकरच लवकरच सुटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

अजय बोरस्ते यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. शिवसेनेकडून हेमंत गोडसेच उमेदवार राहतील. सर्वांच्या संमतीने हेमंत गोडसे यांचे नाव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले होते. हेमंत गोडसे यांच्या नावाला काही अडचण येत असेल तर मी इच्छुक आहे.', असे अजय बोरस्ते यांनी स्पष्टपणे सांगितले.

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेनंतर अजय बोरस्ते यांनी आज नाशिकमध्ये मोठा खुलासा केला. नाशिकची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील उबाठाचे अनेक नेते बिनशर्त शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा बोरस्ते यांनी केला. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असे देखील अजय बोरस्ते यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नाशिकमधील उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी आपण नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी माघार घेतल्यामुळे या मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्याच नावाची चर्चा होती. असे असताना देखील अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. अशामध्ये बुधवारी हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा होणाची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT