Nashik Lok Sabha Rajabhau vaje 
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha Election 2024: नाशकात गोडसेंना धोबीपछाड; राजाभाऊ वाजेंचा दणदणीत विजय

Nashik Lok Sabha Rajabhau vaje: नाशिक मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होती. शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राजाभाऊ वाजेंनी विजय मिळवलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मी निवडून येणारच,निकालाआधी केलेला हा दावा राजाभाऊ वाजेंनी खरा ठरवत विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा झालेल्या लढतीत राजभाऊ वाजेंचा विजय झाला. तीनदा खासदारकी निवडून येणाऱ्या हेमंत गोडसेंना 1,61,103 लाख मतांच्या फराकने पराभूत करत विजयाची मशाल पेटवली.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेत राहिलेला होता. नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंसमोर हेमंत गोडसेंचं आव्हान होतं. वाजेंच्या विजयाने महायुतीला मोठा फटका बसलाय. आपण आकडेमोड करणार नाही. मात्र आपल्याला विजयाची खात्री आहे. उद्याचा निकाल हा माझ्या बाजूने लागेल, असा विश्वास राजाभाऊ वाजेंनी निकालाआधी वर्तवला होता.

दरम्यान नाशिक मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होती. आधी नकार दिल्यानंतर अखेरच्या वेळी हेमंत गोडसेंना तिकीट देण्यात आले. तीन टर्मपासून खासदार असलेले गोडसे हे जिंकतील, अशी आशा शिंदे गटाच्या शिवसेनेला होती मात्र दगड जनसंपर्क असलेल्या वाजेंसमोर गोडसेंचा टिकाव लागला नाही. शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची यांची नवव्या फेरी अखेरीस बिकट अवस्था झाली होती. या फेरीत वाजेंनी तब्बल १ लाख मतांनी आघाडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT