Manasvi Choudhary
१८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
मतमोजणी सभागृहात उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकारी केवळ उपस्थित राहून मतांची गोपनीयता राखण्याची शपथ घेतात.
निर्णय अधिकारी ऑफिसर (रिटर्निंग) यांच्या उपस्थितीत सर्व EVM ची तपासणी केली जाते.
मतमोजणीच्या वेळेस राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूमचं सील उघडले जाते, यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग होते.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोस्टल मतांची मोजणी करण्यात येते, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी ३० मिनिटांनी सुरू होते.
मतदान केंद्रावर क्रमवारीने EVM ऑन करून मतांची मोजणी केली जाते.
मतांची मोजणी आणि निवडणुकीचे निर्णय अधिकाऱ्याच्या प्रत्यक्ष देखरेखेखाली केली जाते.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत १४ ईव्हीएममधील मतांची मोजणी केल्यानंतर निकाल जाहीर केला जातो.