Manasvi Choudhary
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सुरू आहे.
या निवडणुकीच्या काळात आपल्या कानावर एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल नावाचे शब्द पडतात.
आज १ जूनला विविध प्रसार माध्यमे आणि यंत्रंणाकडून एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत.
यानुसार, एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमधील नेमका फरक काय? ते जाणून घेऊया.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजेच निवडणुकीच्या दरम्यान केलेला सर्व्हे असतो.
ओपिनियन पोल हा मतदान होण्याआधी घेतला जातो. तर एक्झिट पोल हा मतदारांकडून मतदान झाल्यानंतर जाहीर केला जातो.
या निवडणूकीच्या निकालाआधी प्रसार माध्यमे तसेच विविध यंत्रणांकडून एक्झिट पोल माहिती देते.