Nashik Loksabha Constituency :  Saamtv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

Nashik Loksabha Constituency : महायुतीमध्ये नाशिक लोकसभेवरुन सुरू असलेली रस्सीखेच अद्याप कायम आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस उरलेले असतानाही अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.

अभिजीत सोनावणे

नाशिक|ता. २९ एप्रिल २०२४

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेवरुन सुरू असलेली रस्सीखेच अद्याप कायम आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस उरलेले असतानाही अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रम कायम असतानाच शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उमेदवारी जाहीर झाली नसताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. आज शांतीगिरी महाराज यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरात भव्य रॅलीसह शोभा यात्रा काढण्यात आली.

परंतु सर्वात मोठा ट्वीस्ट म्हणजे अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केलेले शांतिगिरी महाराज यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच सुरू आहे. अशातच शांतिगिरी महाराजांनी महायुतीकडून उमेदवारी दाखल केल्याने चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले शांतीगिरी महाराज?

दरम्यान, "मी आज उमेदवारी अर्ज भरला. मात्र अजू पर्यंत कोणत्याही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. सध्या माझा अर्ज अपक्ष आहे. माझ्या भक्त परिवारातील जे लोक आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. ते काय निर्णय घेतील यावर मी महायुतीचा उमेदवार होऊ शकतो. मात्र आज शिंदे गटाचे नाव मात्र उमेदवारी अर्जात टाकले आहे," असे शांतिगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT