अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक
नाशिकमध्ये आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा वगैरे हा सगळा आता भूतकाळ झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपला मतदानाचा हक्क बजवा, अशी विनंती त्यांनी मतदारांना केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, त्यासाठी सत्याग्रह करा असं आवाहन केलं आहे. मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाही. त्यामुळे मतदान करा. कांद्याच्या माळा घालून गेलो, म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा, मतदान अधिकारी काय करणार असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
ते बोलताना म्हणाले (Nashik Lok Sabha) की, भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली, ही गोष्ट माझ्या कानावर आली आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर उमेदवाराच्या निशाणीचा बॅच होता. मी पोलीस आयुक्तांना सांगितलं की, तो बॅच काढून घ्या. त्यांना मतदान करू द्या. त्याप्रमाणे सर्व सुरळीत सुरू (Lok Sabha Election 2024) आहे.
भुजबळ कुटुंबाच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, २०१४ आणि २०१९ मध्ये भुजबळ कुटुंबीयांपैकी एक उमेदवार होता. २००९ मध्ये समीर भुजबळ खासदार झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी (Chhagan Bhujbal Voting News) लाटेत आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यामुळे आम्हाला यश मिळू शकलं नाही. मात्र, या तीन निवडणुकीनंतर आमचा नाशिकमधून उमेदवार उभा असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.