Nashik Lok Sabha Yandex
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha: नाशिक जिल्ह्यातील'या' दिग्गज उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

Election Commision Notice: नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतीगिरी महाराजांसह भास्कर भगरेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतीगिरी महाराजांसह भास्कर भगरेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. आपण नेमकं प्रकरण काय आहे, ते पाहू या. निवडणूक विभागाची पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार केल्याचं नाशिकमध्ये (Nashik Lok Sabha Costituency) समोर आलं आहे.

याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतीगिरी महाराजांसह (Shantigiri Maharaj) भास्कर भगरेंना नोटीस दिली आहे. त्यांना पुढील ४८ तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश निवडणूक ( Election Commision Notice) निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. खुलासा प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासह खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन निरीक्षक कार्यरत करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यम प्रमाणीकरण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे. परंतु नाशिकमध्ये या नियमाचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय. उमेदवारांकडून विना परवानगी सोशल मीडियावर प्रचार होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सोशल मीडियावरील प्रचार थांबवत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकमध्ये अंतिम टप्प्यात मतदान पार पडणार आहे. २० मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याअगोदर निवडणुक अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. आता पूर्वपरवानगी न घेता प्रचार करणं नाशिक आणि दिंडोरी संघातील उमेदवारांना (Hemant Godse Rajabhau Waje) महागात पडलं आहे. त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता हे उमेदवार निवडणूक आयोगाला काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

SCROLL FOR NEXT