Ratnagiri Sindhudurg, Uday Samant and Kiran Samant  SAAM TV
लोकसभा २०२४

Narayan Rane : नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया सर्वात आधी 'साम'वर; सामंतांबाबत काय म्हणाले?

Narayan Rane Statement : भाजपनं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया सर्वात आधी 'साम टीव्ही'वर दिली.

Nandkumar Joshi

महायुतीकडून भाजप आणि शिवसेनेनेही केलेल्या दाव्यामुळं महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जागावाटपात भाजपच्या खात्यात गेला असून, पक्षानं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया सर्वात आधी 'साम टीव्ही'वर दिली. शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या किरण सामंत आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणेंना पाठिंबा जाहीर केला आहे. नारायण राणेंनीही त्यांचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha constituency) चर्चेत होता. या जागेवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटानंही दावा केला होता.

शिवसेनेकडून किरण सामंत हे इच्छुक होते. दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्यानं उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला होता. अखेर हा तिढा आता सुटला आहे.

भाजपनं रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून (Ratnagiri–Sindhudurg) ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या मतदारसंघातील प्रमुख लढत आता निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात आता थेट सामना होणार आहे.

नारायण राणेंच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी

भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना (Narayan Rane) मैदानात उतरवलं आहे. राणेंच्या नावाची घोषणा होताच त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी राणे यांच्या कणकवली येथील घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली.

उदय सामंत-किरण सामंत काय म्हणाले?

नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. तत्पूर्वी उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून तिकीटवाटपावर चर्चा सुरू आहे. अर्ज भरण्याची वेळ आली तरी उमेदवार जाहीर झाला नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे किरण सामंत यांनी निर्णय घेतला. नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तरी, प्रामाणिक काम करू. उद्या उमेदवारी अर्ज भरताना आम्ही राणे यांच्यासोबत ताकदीने उभं राहू. महायुतीत तिढा नको म्हणून किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे. तर किरण सामंत म्हणाले की, 'नारायण राणे यांना माझ्या शुभेच्छा.'

दरम्यान, सामंत यांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन करून त्यांचे आभार मानले.

नारायण राणे म्हणाले, आनंद आहे!

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंनी सर्वात आधी साम टीव्हीवर प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे. मी उद्या सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं राणे म्हणाले.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला मदत करण्याचे आणि मला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यांचे मी आभार मानतो. ही निवडणूक एकतर्फी होईल. मी प्रचंड मताधिक्यानं निवडून येईल, असा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT