Kidney Health: शनिवार-रविवारच्या 'या' ६ सवयींमुळे किडनी खराब होतेय? चुका आताच सुधारा

Surabhi Jayashree Jagdish

वीकेंड

शनिवार-रविवारच्या सुट्टीत रोजच्या तुलनेत खाण्यापिण्याची आणि झोपण्याची वेळ बदलते. बाहेर फिरणं, उशिरापर्यंत जागणं किंवा बाहेरचे पदार्थ खाणं यामुळे रोजची नियमित शेड्यूल बिघडू शकतं. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही पाणी, आहार, झोप आणि इतर रोजच्या सवयींची शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे आहे.

पाणी कमी पिणं

वीकेंडला फिरणं, प्रवास करणं किंवा मित्रांसोबत वेळ घालवताना अनेकदा पुरेसं पाणी प्यायलं जात नाही. शरीरात पाण्याची कमतरता झाली की, लघवी जास्त दाट होते आणि काही लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

लघवी जास्त वेळ रोखून ठेवणं

लांबचा प्रवास, शॉपिंग, सिनेमा किंवा गेमिंगमध्ये व्यस्त असताना लघवीची इच्छा झाली तरी काही जण ती बराच वेळ रोखून ठेवतात. एखाद्या वेळी लघवी थोडा वेळ थांबवणं मोठी समस्या नाही. पण ही सवय वारंवार होत असेल ते योग्य नाही. त्यामुळे लघवीची इच्छा झाल्यावर शक्यतो जास्त वेळ न थांबता वेळेवर वॉशरूमला जाणं चांगलं.

जास्त प्रमाणात मीठ खाणं

वीकेंडला रेस्टॉरंटमधील पदार्थ, इन्स्टंट नूडल्स, पिझ्झा, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याचं प्रमाण वाढतं. या पदार्थांमधून शरीरात सोडियमचं प्रमाण जास्त जाऊ शकते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेणं

वर्कआउट, ट्रेक किंवा खेळल्यानंतर अंगदुखी झाली की, काही जण स्वतःहून पेनकिलर घेतात. आयबुप्रोफेन आणि डायक्लोफेनाकसारखी औषधं किडनीमध्ये जाणारा रक्तप्रवाह कमी करू शकतात. शरीरात पाणी कमी असताना काही लोकांमध्ये अचानक किडनीला इजा होण्याचा धोका वाढू शकतो.

वीकेंडला खूप उशिरापर्यंत जागणं

शुक्रवार आणि शनिवार रात्री खूप उशिरापर्यंत जागून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपल्याने झोपेचे नियमित शेड्यूल बिघडू शकतं. वीकेंडला झोपण्याची वेळ खूप बदलल्यास शरीराचं नैसर्गिक चक्र विस्कळीत होऊ शकतं. अनियमित झोप लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्यांशी संबंधित आहे.

वीकेंडला फास्ट फूड खाणं

प्रत्येक शनिवार-रविवारी रेस्टॉरंटमधील पदार्थ, साखरयुक्त पेयं, तळलेले पदार्थ आणि पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही. अशा आहारातून शरीरात जास्त कॅलरी, मीठ आणि फॅट जाऊ शकतं. यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

Liver Cancer Symptoms
येथे क्लिक करा